esakal | 82 हजारांपेक्षा अधिक पुरातन नाण्याचे संगमनेरमध्ये होणार पुजन
sakal

बोलून बातमी शोधा

More than 82000 ancient coins will be worshiped at Sangamner

दिवाळीचा मुख्य सण म्हणजे लक्ष्मीपूजन... आपल्या घरातील चलनी नोटा किंवा खास पूजेसाठी बँकेतून आणलेल्या करकरीत नोटांची बंडले पूजेत ठेवण्याची परंपरा सर्वत्र पाळली जाते.

82 हजारांपेक्षा अधिक पुरातन नाण्याचे संगमनेरमध्ये होणार पुजन

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : दिवाळीचा मुख्य सण म्हणजे लक्ष्मीपूजन... आपल्या घरातील चलनी नोटा किंवा खास पूजेसाठी बँकेतून आणलेल्या करकरीत नोटांची बंडले पूजेत ठेवण्याची परंपरा सर्वत्र पाळली जाते. मात्र अडीच हजारांपेक्षा पुरातन काळातील सुमारे 82 हजार चलनी नाण्यांचा संग्रह पदरी बाळगणारा अवघ्या पस्तीशीचा छांदिष्ट लक्ष्मीपुत्र संगमनेरात आहे.

संगमनेरमधील गांधी चौकात पारंपरिक भांडे विक्रीचा व्यवसाय असलेल्या गौरव रासने यांच्या हातात वयाच्या अकराव्या वर्षी मोडीत आलेले तांब्याचे जडशिळ नाणे पडले. त्यावरील राजा शिव छत्रपती ही अक्षरे पाहून बालमन मोहरले. वेगळा खजिना हाती गवसल्याचा आनंद झाला. संगमनेर या तालुक्याच्या गावी परिसरातील ग्रामस्थ घरातील जुनी पुराणी तांब्या पितळेची भांडी मोडीत देत असत. त्यातून गौरवला अनेक नाण्यांचा लाभ झाला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
झपाटल्यासारखा त्याने याचा संग्रह सुरु केला. उत्तरोत्तर तो वाढत गेला. पुढे शिक्षणामुळे परिपक्वता आल्यानंतर त्याने या सर्व नाण्यांचे रितसर वर्गिकरण करुन, नाणकशास्त्राचा अभ्यास सुरु केला. यासाठी मध्यप्रदेशच्या राष्ट्रीय मुद्रा परिषद व कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्युमिसमॅटीक अँड रेअर आयटम्स, नाशिक या संस्थांचे आजिव सभासदत्व स्वीकारले. मिळेल त्या ठिकाणाहून आर्जवे, विनंती करुन, जास्त मोबदला देवून नाणी मिळवली. व्यवसाय सांभाळताना या छंदात इतका रमला की, संग्रहासाठी जागा अपुरी पडू लागली. त्यांच्या संग्रहात सातवाहन काळापासून आजपर्यंतची वजनाच्या भाषेत सुमारे 700 किलो नाणी जमली आहेत.

हेही वाचा : गोधन फार्मतर्फे दुध उत्पादक सभासदांना अकरा लाख रुपये रिबेट वाटप
गौरव रासने यांच्या संग्रहात फुटक्या कवडी पासून खरोष्टी, पाली लिपीची अक्षरे असलेली सातवाहन कालीन, मध्ययुगीन विष्णू कंडीन, क्षत्रप, गुप्त या काळातील इ.स. 200 ते 1000 काळातील नाणी, 1000 ते 1700 या काळातील सल्तनत, आदिलशाही, 1347 ते 1527 या काळातील बहामनी राजवट, मुगलकाळातील हुमायून ते बहादूर शहा जफर, मराठा साम्राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाई काळातील विविध नाणी आहेत.

या शिवाय इंदोर ते त्रावणकोर अशा सर्व संस्थांनाची चलनी नाणी, पोर्तूगिझ, डच, इस्ट इंडीया कंपनी, ब्रिटीश इंडीया, रिपब्लिक इंडीया या शिवाय आधुनिक चलनी नोटा, नाणी यांचा मोठा संग्रह आहे. पुरातन धातुची चुल बोळकी, खेळणी, अडकित्ते, दागिन्यांच्या पेट्या, पानाचे तबक, विविध टोकन अशा अनेक वस्तूंनी त्यांचा संग्रह समृध्द झाला आहे. तब्बल 82 हजारांपेक्षा अधिक नाण्याचे वर्गिकरण करण्याचे त्यांचे काम सुरु आहे. 


ही नाणी म्हणजे केवळ संग्रह नसून एक पुराणकालीन ठेवा आहे. चांदी, सोने, तांबे आदी धातूंची नाणी, अज्ञान व पैशांच्या मोहापायी वितळवल्याने अनेकदा नष्ट होतात. ती पुन्हा कधीही मिळत नाही. हा इतिहासाचा ठेवा नष्ट होण्यापासून वाचवून तो पुढील पिढीसाठी जतन करण्याचा माझा छोटासा प्रयत्न सुरु आहे. 
- गौरव रासने, नाणे संग्राहक, संगमनेर

संपादन : अशोक मुरुमकर