esakal | सौरऊर्जा प्रकल्पाचे काम लवकर सुरू करा
sakal

बोलून बातमी शोधा

MP Dr. Sujay Vikhe Patil has done suggested to start the work of solar energy project soon.jpg

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले, की महापालिका पाणीपुरवठ्यापोटी महावितरणला अंदाजे एक ते सव्वा कोटीपर्यंतचे बिल दरमहा भरते.

सौरऊर्जा प्रकल्पाचे काम लवकर सुरू करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : शासनाकडून सौरऊर्जा प्रकल्पासाठी 28 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत; परंतु मागील वर्षी कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली नाही. प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा सूचना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई- सकाळचे ऍप 

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठीच्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या कामाची आढावा बैठक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महापालिकेत घेतली. या वेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, उपायुक्‍त प्रदीप पठारे, संतोष लांडगे, नगरसेवक कुमार वाकळे, स्वप्नील शिंदे, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभागप्रमुख आर.जी.सातपुते, विद्युत विभागप्रमुख राजेंद्र म्हेत्रे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा  

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले, की महापालिका पाणीपुरवठ्यापोटी महावितरणला अंदाजे एक ते सव्वा कोटीपर्यंतचे बिल दरमहा भरते. या प्रकल्पामुळे मनपाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. 'मेडा'ने सहा कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. उर्वरित 21 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव 'मेडा'ने तयार करण्याच्या सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्या. त्यासाठी शासनाकडून मंजुरी आणू, असे सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई फळाला ? अण्णांच्या उपोषणाचं चित्र दुपारनंतर होणार स्पष्ट

महापौर वाकळे म्हणाले, या प्रकल्पाला 17 डिसेंबर 2018 रोजी शासनाकडून मंजुरी मिळाली. त्यासाठी 28 कोटी 50 लाख रुपये प्राप्त झाले. या योजनेचे काम लवकर झाल्यास महापालिकेचे पाणीपुरवठ्यापोटी येणारे वीजबिल कमी होण्यास मदत होईल. यादृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प लवकर कार्यान्वित होणे आवश्‍यक आहे. महापालिकेला विद्युत बिलापोटी मोठी रक्‍कम भरावी लागते. त्यामुळे नागरिकांना नागरी सुविधा देण्यास अडचणी येतात. कोरोनामुळे वर्षभर या कामाच्या कार्यवाहीस विलंब झाला. या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाहीस गती देऊन लवकर प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

loading image