

Nilesh Lanke Pushes for Scientific Control of Leopard Population in Maharashtra
Sakal
पारनेर : नाशिक मंडलात वाढत चाललेल्या मानव आणि बिबट संघर्षाच्या धोकादायक परिस्थितीकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारने वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या बिबट जनसंख्या नियंत्रण प्रस्तावाला त्वरित ‘मूलतत्त्व मंजुरी’ द्यावी, असेही लंके यांनी निवेदनात म्हटले आहे.