Ahilyanagar News: 'खासदार निलेश लंके वाहतूक कोंडी साेडवण्यासाठी उतरले रस्त्यावर'; अहिल्यानगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर वाहनांची गर्दी

Ahmednagar–Manmad National Highway: कोल्हार खुर्द ते कोल्हार बुद्रुक दरम्यान प्रवरानदीवरील एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होत आहे. शुक्रवारी दिवसा रात्री आणि आज दिवसभर तशीच परिस्थिती राहिली. दरम्यान खासदार लंके मोटारीने नाशिककडे जाताना तेही या वाहतूक कोंडीत अडकले.
MP Nilesh Lanke personally managing traffic on Ahmednagar–Manmad National Highway amid heavy congestion.
MP Nilesh Lanke personally managing traffic on Ahmednagar–Manmad National Highway amid heavy congestion.Sakal
Updated on

कोल्हार: अहिल्यानगर - मनमाड राष्ट्रीय मार्गावर कोल्हार भगवतीपूरला (ता.राहाता) सलग दोन दिवसांपासून वाहतुकीच्या कोंडीचा फटका बसत आहे. आज दुपारी वाहतुकीच्या कोंडीत अडकलेले खासदार नीलेश लंके रस्त्यावर उतरून वाहतूक मोकळी करण्यासाठी सरसावले. त्यांचे हे सहज वागणे गावकऱ्यांच्या व प्रवाशांच्या चर्चेचा विषय ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com