आघाडी सरकारला सामान्यांचे घेणे-देणे नाही : डॉ. सुजय विखे

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकरी व सामान्यांचे काही घेणे-देणे नाही...
MP Dr Sujay Vikhe Patil
MP Dr Sujay Vikhe Patilesakal

श्रीगोंदे (जि. अहमदनगर) : श्रीगोंद्यासह जिल्ह्यात रस्त्यांच्या कामांचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातूनच सर्व कामे सुरू आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकरी व सामान्यांचे काही घेणे-देणे नाही. विकासपुरुष अशी उपाधी लावलेले नेतेही भाजपच्या विकासकामांत येऊन नारळ वाढवीत असल्याने, केंद्राचे काम उत्तम सुरू असल्याचा दाखला मिळत आहे. या सगळ्यात राज्य सरकार कोणाचा विकास साधत आहे, असा सवाल खासदार डॉ. सुजय विखे (MP Dr Sujay Vikhe Patil) पाटील यांनी केला.

खासदार विखे पाटील म्हणाले, की रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. कामाचा दर्जा चांगला हवा, ही पहिली अट आमची राहते. दर्जेदार कामे झाली तरच त्या निधीचा उपयोग होतो. श्रीगोंद्यासह जिल्ह्यात केंद्र सरकारचा मोठा निधी त्यासाठी खर्च होत आहे. निधीसाठी कोरोनाचे कारण केंद्राने पुढे केलेले नाही. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे निधी देऊन कामे सुरू आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सामान्यांसाठीचा विकास कुठेही दिसत नाही. उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील सामान्यांना वेठीस धरण्याचा उद्योग झाला आहे.

केंद्राचा निधी आला त्या रस्त्यांच्या कामाचा नारळ वाढविण्यासाठी विकासपुरुष उपस्थितीत राहतात. जिल्ह्यात आमचे काम उत्तम सुरू आहे, ते दिसतच आहे, असा टोला मारत डॉ. विखे म्हणाले, की मी तर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची वाट पाहतोय. प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश करू.

MP Dr Sujay Vikhe Patil
डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

शहरात विविध विकासकामांचा प्रारंभ आज खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ६० वर्षांवरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत सहायक साधनांच्या वाटपासाठी तपासणी शिबिर झाले.

आमदार बबनराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, केशवराव मगर, बाळासाहेब गिरमकर, संजय जामदार, संदीप नागवडे, बाळासाहेब महाडीक, अनिल ठवाळ, अनुजा गायकवाड, सुवर्णा पाचपुते, बापूसाहेब गोरे, सिद्धेश्वर देशमुख उपस्थित होते.

MP Dr Sujay Vikhe Patil
सलग चौथ्या वर्षी ‘मुळा’ काठोकाठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com