esakal | महावितरणची श्रीरामपूरमधून २१ कोटी रूपयांची वसुली

बोलून बातमी शोधा

MSEDCL recovered Rs. 21 crore from Shrirampur division
महावितरणची श्रीरामपूरमधून २१ कोटींची वसुली
sakal_logo
By
अशोक निंबाळकर

नगर : महावितरणने कृषिपंप वीज धोरण 2020 योजना सुरू केली. या योजनेद्वारे वीजबिलाच्या थकबाकीत तब्बल 66 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत मिळवित श्रीरामपूर विभागातील 17 हजार शेतकऱ्यांनी 21 कोटी 28 लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्या

या भरलेल्या वीजबिलाच्या रकमेतून सदर ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत आहे. या भागात 63 केव्हीए ऐवजी नवीन 100 केव्हीएची रोहित्रे बसविण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा: ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण-2020 अंतर्गत महाकृषी अभियानाची महावितरणद्वारे अंमलबजावणी केली जात आहे. गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी 33 टक्के रक्कम त्याच गावच्या वीजपुरवठाविषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. या योजनेअंतर्गत श्रीरामपूर विभागातील 64 हजार 681 कृषिपंप ग्राहकांकडे 540 कोटी रुपये थकबाकी आहे. यापैकी 327 कोटी पाच लाख रुपये रक्कम या योजनेअंतर्गत माफ होणार आहे.

उर्वरित 212 कोटी पाच लाख रुपये कृषिपंप ग्राहकांनी भरावयाची आहे. श्रीरामपूर विभागातील कृषिपंपधारकांनी वीजबिल भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जवळपास 17 हजार ग्राहकांनी 21 कोटी 28 लाख रुपयांचा भरणा केला. या वसूल झालेल्या रकमेतून ग्रामपंचायत स्तरावर रोहित्र क्षमता वाढ, नवीन रोहित्र उभारणी, शेती पंप जोडणीची कामे करण्यास महावितरणने सुरवात केली आहे.

राहुरी तालुक्‍यातील वांबोरी, कात्रस, चेडगाव, बारागाव नांदूर, कुरणवाडी, गुहा, तांभेरे, देवळाली प्रवरा, पाथरे, आरडगाव या गावांमध्ये कृषिपंपधारकांनी थकीत बिल भरण्यास प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार राहुरी तालुक्‍यात सहा ठिकाणी 63 केव्हीए ऐवजी 100केव्हीएव आठ नवीन रोहित्रांचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आहे. त्यापैकी वांबोरी कक्षातील दोन ठिकाणी 63 केव्हीए रोहित्रांच्या जागी 100 केव्हीए क्षमतेची रोहित्रे बसविण्यात आली आहेत.

वीज बिल भरा

शेतकऱ्यांनी वीजबिलांचा भरणा केल्यास नवीन रोहित्र व विद्युत यंत्रणा सक्षमीकरणाचे काम करता येणे शक्‍य आहे. इतर कृषिपंपधारकांनीही या योजनेचा लाभ घेऊन थकीत वीजबिलाचा भरणा करावा.

- अनिल थोरात, कार्यकारी अभियंता, श्रीरामपूर विभाग, महावितरण