
सोनई :धर्मदाय आयुक्तांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांना मुंबईच्या कार्यालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची नोटीस दिली असली, तरी नोटीसमध्ये उल्लेख असलेल्या आपण किंवा आपल्या प्रतिनिधीने समक्ष हजर राहावे हा धागा पकडून सर्व विश्वस्तांनी मुंबईची वारी टळली आहे. नेमण्यात आलेले वकील उद्या गुरुवार (ता.१८) रोजी आपले म्हणणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात मांडणार आहे. देवस्थानचे अध्यक्ष व उपाध्यक्षांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.