महापालिका आयुक्त गोरेंनी घेतला पदभार, कोरोनाला करणार हद्दपार

Municipal Commissioner Gore took charge
Municipal Commissioner Gore took charge

नगर ः राज्यात कोरोनाचा पुन्हा प्रादूर्भाव होत आहे. ही बाब लक्षात घेऊन नगरमधून कोरोना हद्दपार करण्यासाठी कोविड कामाला प्राधान्य देणार आहे. त्यासाठी महापालिकेतील राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)च्या सर्व रिक्‍त जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. पुरेशा औषधांचा स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे नूतन आयुक्‍त शंकर गोरे यांनी दिली. 

गोरे यांनी आज महापालिकेत आयुक्‍तपदाचा पदभार स्वीकारला. या प्रसंगी महापालिकेतील सर्व विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच पत्रकारांशी संवाद साधला. गोरे म्हणाले, महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोविडची लस घेतलीच पाहिजे.

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता कोविड सेंटर सज्ज ठेवण्यात येत आहेत. कोविडचा प्रसार होऊ नये यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे गोरे यांनी सांगितले. 

नागरिकांच्या समन्वयातून सोडविणार प्रश्‍न 
महापालिकेतील पायाभूत सेवा सुविधा व बजेटमधील निधी पाहूनच विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. शहरातील सर्व रस्ते दुरूस्तीसाठी प्रयत्न करण्यात येईल. नागरी समस्या या नागरिकांच्या समन्वयातूनच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे महापालिकेचे नूतन आयुक्‍त शंकर गोरे यांनी सांगितले. 

"ते'ही साताऱ्याचेच 
महापालिकेचे नूतन आयुक्‍त हे साताऱ्याचे रहिवासी आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात आलेले महत्त्वाचे अधिकारी योगायोगाने सातारा-सांगली जिल्ह्यातीलच आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे साताऱ्याचे, तर पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे सांगली जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. त्यामुळे नगरवर सातारा-सांगलीचा अधिकार चालणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com