esakal | दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापार्‍यांना पालिकेतर्फे नोटिसा

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation has issued notices to traders encroaching in front of shops at Rahuri..jpg}

राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक निलेश वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, पोलिस व अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईत भाग घेतला.

दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापार्‍यांना पालिकेतर्फे नोटिसा
sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राहुरीच्या बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या मिटविण्यासाठी राहुरी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे शिस्तीचा बडगा उगारला. शनिवारी नवीपेठ येथे शनिचौक ते नगर-मनमाड महामार्गपर्यंत दुकानांच्या समोर वाहनांचे पार्किंग व हातगाड्यांसाठी पाच फुटापर्यंत लक्ष्मण रेषा आखण्यात आली. दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापार्‍यांना पालिकेतर्फे नोटिसा बजावण्यात आल्या. 

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक निलेश वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, पोलिस व अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईत भाग घेतला.

बेलवंडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यासह सहा पोलिस कर्मचारी कोरोना बाधित

राहुरीच्या बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुकानांसमोर वाढलेली अतिक्रमणे, बेशिस्तपणे दुकानांसमोर उभी केलेली ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी राहुरी पालिका व पोलिस यंत्रणेने धडक कारवाईचा बडगा उगारला. पालिकेने दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावून, तात्काळ अतिक्रमण हटवण्याची ताकीद दिली. दुकानांसमोर पाच फुटाची लक्ष्मण रेषा काढली. त्याबाहेर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर सोमवारपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.