Nagar Crime : एटीएम फोडणारी टोळी टाकळीत जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चार आरोपींना अटक

आरोपींनी वाकोडी फाटा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ९ जुलैला घडली होती.
Nagar Crime
Nagar Crime Sakal

Nagar - गॅस कटरच्या साहाय्याने बँकांचे एटीएम फोडणारी गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर, एक कार, दोन दुचाकींसह चोरीसाठी लागणारे साहित्य, असा एकूण १८ लाख १६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Nagar Crime
Mumbai Crime : कॉलगर्ल घरी येत नाही म्हणून केली शिवीगाळ; 42 वर्षीय व्यक्तीची गळा चिरुन हत्या

अजित अरुण ठोसर (वय २२, रा. मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. पंपिंग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर), जमीर जाफर पठाण (वय २१, रा. खांडगाव, ता. संगमनेर), रवींद्र वाल्मीक चव्हाण (वय ३२) व शुभम पोपटराव मंजुळे (वय २५, दोघे रा. खडकी, ता. कोपरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी वाकोडी फाटा येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना ९ जुलैला घडली होती. याप्रकरणी बँकेचे शाखा प्रबंधक प्रशांत अशोक साळवे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली.

Nagar Crime
Mumbai Railway : भायखळा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे वाहतुकीचे वाजले तीन तेरा; प्रवाशांचे प्रचंड हाल!

बँकेतील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आहेर यांच्या पथकाने खातगाव टाकळी गावच्या शिवारात दोन आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यांच्या इतर दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली.

आरोपींनी भिंगार, राहुरी, वैजापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर व अंभोरा आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी अजित ऊर्फ कमळ्या अरुण ठोसर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com