Nagar Panchayat Election : ‘पारनेर’ची निवडणूक जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Panchayat Election

Nagar Panchayat Election : ‘पारनेर’ची निवडणूक जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर : अनेक दिवस प्रतीक्षेत असलेली पारनेर नगरपंचायतीची निवडणूक अखेर जाहीर झाली. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एक डिसेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार आहे. २१ डिसेंबरला मतदान होत आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा: अग्रलेख : ‘क्रिप्टो’चा चक्रव्यूह

आज (ता. २४) नगरपंचायतीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. कालच प्रारूप याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यावर २६ नोव्हेंबरअखेर हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकतींचे निराकरण करून २९ नोव्हेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी, तर ३० नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

पारनेर नगरपंचायतीची मुदत वर्षभरापूर्वीच संपली होती. मात्र, राज्यात कोरोनाची स्थिती असल्यामुळे एक वर्षापासून नगरपंचायतीवर प्रशासक होते व ही निवडणूक लांबणीवर पडली होती. आता मात्र, निवडणूक जाहीर झाल्याने तालुक्यातील राजकारण तापणार आहे. २१ डिसेंबरला मतदान असल्याने उमेदवारांना फक्त प्रचारासाठी २१ दिवस मिळणार आहेत. मात्र, उमेदवारी मिळविणे, त्यानंतर अर्ज भरणे यासह इतर प्रक्रियांसाठी उमेदवारास खूपच कमी कालावधी आहे.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2021

इच्छुकांनी या पूर्वीच मतदारांशी दीपावलीचे निमित्त पुढे करून भेटवस्तू किंवा मिठाईचे वाटप केले. तसेच आत्ताही अनेक जण दिवस-रात्र प्रभागात गाठीभेटी घेत आहेत. आज निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. तो असा : एक ते सात डिसेंबर अर्ज दाखल करणे, १३ डिसेंबर अखेर अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. गरज पडली तर २१ डिसेंबरला मतदान होणार असून २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

loading image
go to top