नगरचा सुदर्शन कोतकर उत्तर महाराष्ट्र केसरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरचा सुदर्शन कोतकर उत्तर महाराष्ट्र केसरी

नगरचा सुदर्शन कोतकर उत्तर महाराष्ट्र केसरी

पाथर्डी :  उत्तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र केसरी ''किताब नगर येथील सुदर्शन महादेव कोतकर याने पटकावला. नाशिक येथील बाळू बोडखे याच्यावर त्याने मात केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा तालीम संघ व संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर कारखान्याच्या वतीने दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाच्या प्रांगणात ही स्पर्धा रंगली. आज सायंकाळी कोतकर व बोडखे यांच्यात अंतिम लढतीला  सुरवात झाली.

हेही वाचा: अग्रलेख : पायलट यांचे लॅंडिंग!

केदारेश्वरचे अध्यक्ष प्रताप ढाकणे व तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. तब्बल चाळीस मिनिटे ही कुस्ती रंगली. कोतकर याचे वजन १२४ किलो तर बोडखे याचे वजन ८४ किलो असल्याने ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते. मात्र, कोतकर याला बोडखे याने शेवटच्या क्षणापर्यंत झुंजवले. दोघेही एकमेकांना आवरत नव्हते.

एका क्षणी कोतकर याने बोडखे याला उचलून खाली पाडत आपण जिंकल्याची दाद पंचाकडे मागितली. पंचांनी या लढतीचे चित्रीकरण तपासून कोतकर याला विजयी घोषित केले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक नगर येथील अनिल ब्राम्हणे याने पटकावला.

हेही वाचा: लष्कराच्या गोपनीय माहितीसाठी आयएसआयचे प्रयत्न

कोतकर याला चांदीची गदा व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे अन्यविजेते असे : ४८ किलो वजनी गट - संकेत सतरकर (नगर), ५८ किलो गट - पवन ढोणर (नाशिक), ६५ किलो गट - सुजय तनपुरे (नगर), ७४ किलो गट - महेश फुलमाळी (नगर), ८४ किलो गट - ऋषिकेश लांडे (नगर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे पंच म्हणून हरियाणा येथील सनी चौधरी, विशाल जाधव, कैवल्य बलकवडे यांनी काम पहिले. सांगली येथील शंकर अण्णा पुजारी यांनी खुमासदार निवेदन केले. पारितोषिक वितरण समारंभ प्रताप ढाकणे, तालिमसंघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काशिनाथ पाटील लवांडे, रफिक शेख, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ. दीपक देशमुख, सिद्धेश ढाकणे, राजेंद्र शिरसाठ, प्रा.अजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत पार पडला.

loading image
go to top