

Nagar Taluka Murder News Man Dies After Iron Weapon Attack While Settling Husband Wife Dispute Brother In Law Absconds
sakal
नगर तालुका: पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेह्ण्याचा लोखंडी कत्तीने खून केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा शिवारातील चिंतामणी डोंगर परिसरात घडली. किरण रोहिदास भोसले (रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा शिवार, ता. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर हरीश गुलाब काळे (मूळ रा. शेडगाव, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. चिंतामणी डोंगर, पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे.