शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी दरंदले, बानकर की शेटे? आठवडाभरात होणार निवड

विनायक दरंदले
Monday, 4 January 2021

त्यात दरंदले आडनावाचे तीन, बानकर दोन, शेटे दोन, तसेच कुऱ्हाट, भुतकर, बोरुडे व आढाव आडनावाचा प्रत्येकी एक विश्वस्त आहे. 

सोनई : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची निवड या आठवड्यात होत आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण होईल, याबाबत मोठी उत्सुकता परिसरात आहे. 

तत्कालीन फडणवीस सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करून देवस्थान सरकारच्या नियंत्रणाखाली आणले. तो निर्णय सध्याच्या आघाडी सरकारने बाजूला ठेवून, पूर्वीप्रमाणे नवे विश्वस्त मंडळ नेमले आहे. नगरच्या सहायक धर्मादाय आयुक्तांनी मागील महिन्यात गावातील अकरा जणांची विश्वस्त म्हणून निवड जाहीर केली आहे. 

हेही वाचा - माजी आमदार राहुल जगताप उतरणार जिल्हा बँकेच्या आखाड्यात

त्यात दरंदले आडनावाचे तीन, बानकर दोन, शेटे दोन, तसेच कुऱ्हाट, भुतकर, बोरुडे व आढाव आडनावाचा प्रत्येकी एक विश्वस्त आहे. 

या सर्वसमावेशक मंडळाचे गाव व परिसरातून कौतुक होत आहे. अध्यक्षपदासाठी प्रा. शिवाजी दरंदले, आप्पासाहेब शेटे व भागवत बानकर यांच्या नावांची चर्चा असून, संधी कोणाला मिळेल, याबाबत चर्चा होत आहे. 

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे काम प्रगतिपथावर असून, पंधरा वर्षांत लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे गावातीलच व्यक्ती विश्वस्त नेमल्याने, ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतील पानसनाला प्रकल्पाचे उद्‌घाटन लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The names of Darandale, Bankar and Shete are being discussed for the post of president