Kopargaon Social Boycott : नंदीवाले तिरमली जातपंचायतचा अजब फतवा मुलीने प्रेमविवाह केल्याने कुटुंबीय बहिष्कृत

Family Allegedly Fined Over Daughter's Love Marriage ; कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे मुलीने प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून नंदीवाले तिरमली जातपंचायतीने कुटुंबाला दंड करून सामाजिक बहिष्कार टाकल्याचा आरोप आहे.
Kopargaon Social Boycott

Kopargaon Social Boycott

esakal

Updated on

कोपरगाव : मुलीने जातीमध्येच प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून तालुक्यातील धामोरी येथील नंदीवाले तिरमली जातपंचायतीने एका कुटुंबाला बहिष्कृत केले. प्रेमविवाह जातीच्या नियमाविरुद्ध असल्याचे सांगत पन्नास हजार रुपये दंड वसूल केला, तसेच या कुटुंबाला वाळीत टाकले. या प्रकरणी जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अंनिसचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी तालुका पोलिस ठाण्यात निवेदन दिले,”.

याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. चांदगुडे यांनी सांगितले, भाऊसाहेब आनंदा अहिरे यांच्या सज्ञान मुलीने केलेला विवाह जात पंचायतीने अमान्य केला. पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. पीडित कुटुंब गरीब असून सुया-फण्या विकून पालामध्ये कशीबशी उपजीविका करत आहे, तरीही त्यांनी पन्नास हजार रुपये कर्ज काढून जातपंचायतीला दिले.

Kopargaon Social Boycott
Maharashtra Agriculture Department : कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध रद्द; २००९चा आकृतिबंध तात्पुरता कायम, फेरप्रस्तावाला मंजुरी

उरलेली रक्कम पीडित कुटुंब देऊ शकले नाही. त्यामुळे जातपंचायतीने पीडितांच्या संपूर्ण कुटुंबाला अमानुष मारहाण केली. त्यांच्याशी कुणीही बोलायचे नाही, सुख-दुःखाच्या प्रसंगात बोलवायचे नाही; अन्यथा त्यांनाही दंड करून जातीबाहेर काढू, असा फतवा काढला. त्यांच्या मुलीला पण भेटून दिले जात नाही. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अहिरे कुटुंबाला बंधनं घातली गेली.

Kopargaon Social Boycott
Raj Thackeray IIT Bombay : आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे प्रकरणावर राज ठाकरे स्पष्टच बोलले; शिक्षणव्यवस्थेवरही सवाल

पीडितांनी ही तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व कोपरगाव अंनिसचे अध्यक्ष डॉ. अशोक गावित्रे यांनी पीडितांना घेऊन कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यान्वये जातपंचायतवर गुन्हा नोंद करण्याचे निवेदन पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिले.

"आम्ही जे केले ते न्यायव्यवस्थेला धरून आहे, तरी जात पंचायतीने आम्हाला दंड करून बहिष्कृत केले आहे."

- भाऊसाहेब अहिरे, मुलीचे वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com