Ahilyanagar Mayor Election: NCP–BJP Political Equation Explained
Sakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Politics: अहिल्यानगर महापालिकेत महापौर राष्ट्रवादीचा; उपमहापौरपद भाजपकडे, नेमक्या काय घडामाेडी घडल्या!
Power sharing formula in Ahilyanagar civic Body: अहिल्यानगर महापालिकेत राष्ट्रवादी-भाजप युतीचा विजय, महापौरपद राष्ट्रवादीकडे
अहिल्यानगर: गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष युतीकडून महापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ज्योती गाडे यांनी, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोनच उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा आता शुक्रवारी (ता. ६) केली जाणार आहे.

