नीटचा पेपर फुटला, पुतण्या उपचार घेतोय, आंदोलनात पुतणी जखमी; भाजप नेत्याच्या राजीनाम्याची पोस्ट व्हायरल

Neet Paper Leak नीट पेपर फुटीमुळे पुतण्याच्या मानसिक आरोग्यवर परिणाम तर आंदोलनात पुतणी जखमी झाल्यानंतर भाजपच्या शहरप्रमुखानं राजीनामा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. तर स्थानिक कार्यकर्त्यांनी असा कुणी पदाधिकारी नसल्याचं म्हटलंय.
नीटचा पेपर फुटला, पुतण्या उपचार घेतोय, आंदोलनात पुतणी जखमी; भाजप नेत्याच्या राजीनाम्याची पोस्ट व्हायरल
Updated on

दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनात सोमवारी दिल्ली पोलिसांकडून बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तसंच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक विद्यार्थी आंदोलक जखमी झालेत. दरम्यान, नीट पेपर फुटीमुळे पुतण्याच्या मानसिक आरोग्यवर परिणाम तर आंदोलनात पुतणी जखमी झाल्यानंतर भाजपच्या शहरप्रमुखानं राजीनामा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.अहिल्यानगरच्या राहुरीचे भाजप शहर प्रमुख गोविंद घोरपडे अशा नावाने पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. नीट पेपर फुटीनंतर फेर परीक्षा पार पडली मात्र पेपर नीट देता न आल्यानं पुतण्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागत आहेत. याचा कुटुंबावरही परिणाम झाला असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय. दुसरीकडे अहिल्यानगरमधील स्थानिक भाजप नेत्यांनी असा कुणी पदाधिकारी नसल्याचं सांगितलंय. NEET Paper Leak Forces BJP Leader's Resignation

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com