सुरू झाली किसान रेल्वे, नगर-कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना उत्तर भारताची बाजारपेठ खुली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 4 September 2020

नगर जिल्ह्यात कांदा, पेरू, द्राक्ष, बाजरी, कापूस लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते. शेतकऱ्यांना कमी खर्चात आपला माल उत्तर भारतात पाठविता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. त्यांच्या हाती जास्तीचे चार पैसे मिळणार आहेत.

नगर : शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वेची सेवा सुरू केली आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील भाजीपाला, फळ, फुलांची वाहतूक इतर राज्यात सुरक्षित व वेगाने होणार आहे. नगरमधील शेतकरी, व्यापारी त्याचा लाभ घेत आहेत. 

दर मंगळवारी कोल्हापुरहून दुपारी दोन वाजता किसान रेल्वे नगरमध्ये येईल. दर शुक्रवारी मनमाड येथून रात्री दहा वाजता येथे येईल. या विशेष रेल्वेचे नुकतेच येथे स्वागत करण्यात आले. पार्सल डब्याची पूजा करून स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर व मुख्य वाणिज्य निरीक्षक रामेश्वर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल भरण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांना मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे आपला माल पाठविता येणार आहे. कोल्हापूर ते मनमाड रेल्वे 25 सप्टेंबरपर्यंत धावणार असून, मनमाड ते कोल्हापूर अशी 27 सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. 

नगर जिल्ह्यात कांदा, पेरू, द्राक्ष, बाजरी, कापूस लिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येते. शेतकऱ्यांना कमी खर्चात आपला माल उत्तर भारतात पाठविता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे शेतकऱ्यांची सोय झाली आहे. त्यांच्या हाती जास्तीचे चार पैसे मिळणार आहेत.

ज्या शेतकऱ्यांना आपला माल पाठवायचा असेल त्यांनी स्टेशन प्रबंधक नरेंद्रसिंह तोमर (95004913) यांच्याशी संपर्क साधावा. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North India market open to Nagar-Kolhapur farmers