
नेवासा : शिव्या देणं हा जणू आपल्या संस्कृतीचाच भाग असल्यासारखं लोक वागत असतात. त्यातही आई-बहिणीवरुन शिव्या देण्याची विकृती लोकांमध्ये दिसून येते, प्रत्येकाच्या घरात आई-बहिण असताना अशा प्रकारे इतरांबाबत वाईट शब्द वापरणं चुकीचं आहे. याबाबत अनेकदा डिबेटही पार पडल्या आहेत.
पण या डिबेटच्याही पुढचं पाऊल राज्यातील एका ग्रामपंचायतीनं टाकलं आहे. त्यानुसार या गावात आता शिव्या देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच जो शिवीगाळ करेल त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे.