
सातारा : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी साताऱ्याला गेले आहेत. सत्तास्थापनेच्या गडबडीतच ते गावी गेल्यानं अनेक चर्चांना तोंड फुटलं होतं. पण आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळं आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.