"निसर्ग'चा "या' विभागाला तब्बल दीड कोटींचा फटका! 

 One and a half crore hit to this section of "Nature"!
One and a half crore hit to this section of "Nature"!
Updated on

नगर ः निसर्ग चक्रीवादळाचा नगर मंडलासह राज्यातील बहुतांश भागाला चांगलाच फटका बसला. यात जिल्ह्यातील विजेचे एक हजार 113 खांब कोसळले. शंभर उपकेंद्रे व आठ हजार 144 रोहित्रे बंद पडली. त्यामुळे 650 गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे महावितरणचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोलमडलेली यंत्रणा आज पुन्हा सुरळीत करण्यात आली. 

शहरासह जिल्ह्यात निसर्ग वादळाच्या थैमानाने वीज यंत्रणेवर मोठा आघात झाला. हवामान खात्याने आधीच सूचना दिल्याने महावितरणने सर्व ठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवली होती. वादळी वाऱ्यासह पावसाने यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटरचा पहिल्याच पावसात फज्जा उडाला. 

वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून बहुतांश ठिकाणी ब्रेकडाऊन करण्यात आले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन आज सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत केला. 

टोल फ्री क्रमांक 
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे जर आजही कुठे विजेचे खांब, वीजवाहिनी, रोहित्राबाबत समस्या असल्यास महावितरणचा टोल फ्री क्रमांक 18002333435 यावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com