पारनेरच्या रस्त्यांसाठी आमदार नीलेश लंके यांनी आणले एक कोटी

one crote fund sanctioned for parner roads : lanke
one crote fund sanctioned for parner roads : lanke

पारनेर : नगतालुक्‍यातील दोन व पारनेर तालुक्‍यातील तीन अशा पाच रस्त्यांसाठी या वर्षासाठीच्या ग्रामीण रस्ते व जिल्हा मार्गांच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीतून आमदार नीलेश लंके यांनी एक कोटी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्याने मंजूर करुन घेतले आहेत. 

जिल्हा परिषद ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग यांच्या अखत्यारीतील हा निधी रस्तेविकासासाठी देण्यात येत असतो. आमदार लंके यांनी या निधीतून बाभूळवाडे-ठाकरवाडी ते अक्कलवाडी, खडीकरण व डांबरीकरणासाठी वीस लाख रुपये, कर्जुले हर्या ते आंधळे झाप खडीकरण व डांबरीकरणासाठी वीस लाख रुपये, पाडळी रांजणगाव ते देवदैठण डांबरीकरणासाठी 25 लाख रुपये या प्रमाणे तालुक्‍यातील तीन रस्त्यांसाठी निधी आणला आहे.

तसेच नगर तालुक्‍यातील शिंगवे नाईक ते कोळ्यांची वस्ती खडीकरण व डांबरीकरणासाठी वीस लाख व निंबळक ते माळवाडी रस्त्यासाठी 15 लाख रुपये असे एक कोटी मंजूर करून आणल्याची माहिती आमदार लंके यांनी दिली. र 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com