..... या बाजार समितीत कांदा लिलाव बंद 

The onion auction was closed in this market committee
The onion auction was closed in this market committee
Updated on

श्रीरामपूर ः कोरोनामुळे येथील कांदालिलाव पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येत आहेत. या काळात मार्केट परिसरात साफसफाई केली जाणार आहे. मार्केटमधील एका हमालाचा मुलगा चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आल्याने हमालांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित हमालाचा तपासणी अहवाल येईपर्यंत संपर्कातील व्यक्ती धास्तावल्या आहेत. 

व्यापारी व हमालांनी दोन दिवस मार्केटमध्ये येण्यास नकार दर्शविला. त्यामुळे कांदालिलाव दोन दिवस बंद राहतील. यासंदर्भात बाजार समिती सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, सचिव किशोर काळे यांनी आज बैठक घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील दोन दिवस कांदा मार्केट बंद ठेवून परिसरात साफसफाई केली जाणार आहे. 

कांदालिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विविध ठिकाणचे व्यापारी, हमाल, शेतकरी उपस्थित असतात. त्यांतील अनेक चेहरे अनोळखी असल्याने कोरोना संसर्गाची दाट शक्‍यता आहे. तसेच, पहाटे भाजीपाला लिलावाच्या वेळीही शहरभर फिरणारे किरकोळ भाजीपाला विक्रेते गर्दी करतात. त्यामुळे मार्केट परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीने दोन दिवस कांदालिलाव बंद ठेवून परिसरातील स्वच्छतेवर भर दिला आहे. अहमदनगर 

संपादन - सूर्यकांत वरकड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com