
सोनई : शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टमधील अॅप घोटाळा व नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्यानंतर अखेर धर्मदाय आयुक्तांनी देवस्थानच्या सर्व विश्वस्तांना म्हणणे मांडण्यासाठी शुक्रवार(ता.१८) रोजी मुंबईत हजर होण्याची नोटीस बजावल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. नोटीसमध्ये कुठलाच विषय नमूद केलेला नसल्याने उत्तर कशावर द्यायचे याविषयी सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या आज पाचव्या दिवशी ‘धर्मादाय’चे म्हणणे काय असणार व त्यावर कसे उत्तर द्यायचे याचीच व्यूहरचना आखण्यात सर्व गुंतले आहेत.