esakal | ॲप डाऊनलोड करणे पडले लाखात; बँक खात्यातून रक्कम गायब
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud through mobile app

ॲप डाऊनलोड करणे पडले लाखात; बँक खात्यातून रक्कम गायब

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : मोबाईलवर ॲप डाऊनलोड करण्यास सांगून, त्या माध्यमातून एक लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना रेल्वे स्टेशन भागातील आगरकर मळ्यात घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (online-fraud-through-mobile-app-ahmednagar-marathi-news)

...आणि रक्कम बँकेच्या खात्यातून गायब

शरद माणिकराव कापकर (रा. आगरकर मळा, रेल्वे स्टेशन, नगर) यांना ७८६६९७०७३३ या क्रमांकावरून सोमवारी (ता. १२) सायंकाळी सात वाजता आलेल्या फोनवरील व्यक्‍तीने, आपण जिओ कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. एनी डिस्क ॲप (Any Disk App) डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार कापकर यांनी हे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांचे बँक खाते असलेल्या स्टेट बँकेच्या खात्यातून ९८ हजार ९९९ रुपये गायब झाले.

ही बाब लक्षात आल्यावर कापकर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित मोबाईल वापरणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(online-fraud-through-mobile-app-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: शरद पवार राष्ट्रपती होणार? राष्ट्रवादीच्या मंत्र्याने दिलं उत्तर

हेही वाचा: ड्रोनबाबत नवा कायदा; केंद्राने जारी केला ड्राफ्ट

loading image