कळंबच्या व्यापाऱ्याचा हरभरा नगरच्या हमीभाव केंद्रावर विक्रीला...स्वाभीमानीमुळे डाळ शिजली नाही

Osmanabad trader sells gram at Shevgaon center
Osmanabad trader sells gram at Shevgaon center

शेवगाव : कळंब (जि. उस्मानाबाद) येथून सुमारे 13 लाख रुपये किमतीचा 26 टन अनधिकृत हरभरा दोन ट्रकमध्ये शेवगाव येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर खाली करण्यासाठी आला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ट्रक पकडण्यात आले. हा माल नोंदणीकृत शेतकऱ्यांचा नाही. संबंधित तक्रार मुंबई कार्यालयाला पाठवली असून, त्यांच्या आदेशावरून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पत्र जिल्हा पणन अधिकारी श्रीकांत आभाळे यांनी दिले. मात्र, हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 

कळंब येथून गुरुवारी (ता. 7) सायंकाळी आलेल्या 26 टन हरभऱ्याच्या दोन ट्रक बाजार समितीच्या आवारात आल्या आणि वजनकाटा करून शासकीय हमी भाव खरेदी केंद्राजवळ हरभरा उतरण्यासाठी उभ्या राहिल्या. काही तरी काळेबेरे असल्याचा संशय आल्याने तेथील काहींनी याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली असता या हरभऱ्याचे बिल ज्या वर्धमान ट्रेडिंग कंपनीच्या नावावर होणार होते, ते शेवगाव तालुक्‍यात नाही. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. विशेष म्हणजे पोलिस येताच केंद्रचालक व हमाल तेथून पसार झाले. 

रात्री उशिरापर्यंत कारवाई न झाल्याने ट्रक पसार होऊ नये, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी रात्री तेथेच जागता पहारा दिला. याबाबत संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करून हरभरा शासनाने जमा करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने तहसीलदार मयूर बेरड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com