कंगना राणावतवर गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेची मागणी

मार्तंड बुचुडे
Saturday, 12 September 2020

अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अतीशय खालच्या भाषेत उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करुन त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे.

पारनेर (अहमदनगर) : अभिनेत्री कंगना राणावत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अतीशय खालच्या भाषेत उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करुन त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत करत असल्याचे निवेदन पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी शिवसेनेच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांना दिले. 

याप्रसंगी सभापती शेळके यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, विजय डोळ, उपशहर प्रमुख संदीप मोढवे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते. शेळके पुढे म्हणाले, भाजपने राणावत यांना बळ दिले आहे. राज्यात कोरोनाने अहाकार माजविला आहे. लोकांना जगण्याची भ्रांत पडली आहे. जनता आर्थिक समस्येने ग्रासली आहे. मात्र भारतीय जनता पक्ष यात राजकारण करत आहे. राज्यातील राजकारण अतीशय खालच्या पातळीवर नेण्याचे काम या पक्षाने चालविले आहे. 

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना दोन महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही. कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे एकीकडे लोकांना काम नाही. दुसरीकडे ज्या लोकांचे हातावर पोट आहे, अशा गोर गरीब जनतेला उदरनिर्वाह व कुटुंब चालविण्यासाठी अनुदान वेळेवर मिळत नाही हे वाईट आहे. हे अनुदान तात्काळ लाभार्थींना मिळावे. या ही अशयाचे निवेदन शेळके व डॉ.पठारे यांच्या सह उपस्थीत शिवसैनिकांच्या वतीने तहसीलदार देवरे यांना देण्यात आले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paraner Shivsena demands to file a case against Kangana Ranaut