esakal | पारनेरमधील कृषी सहाय्यकाचा गावठी दारूचा साईड बिझनेस

बोलून बातमी शोधा

Parner's agricultural assistant's liquor side business

तिथे जेवणाऐवजी गावठी, देशी -विदेशी दारू विक्री केली जात होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु माझ्या जागेत मी काहीही करील अशी अरेरावी तो सतत करीत होता. त्यामुळे ग्रामस्थही हतबल झाले होते.

पारनेरमधील कृषी सहाय्यकाचा गावठी दारूचा साईड बिझनेस
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निघोज : राळेगण थेरपाळ (ता. पारनेर) येथील सुवर्णराज हॉटेलचा मालक व पारनेर कृषी विभागात कार्यरत कृषी सहाय्यक शिवकांत भाऊसाहेब कोल्हे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर अवैधरित्या गावठी दारू विकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गवळी यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - साहेब काही तरी करा, मोदींचे पैसे येईनात

दोन दिवसापूर्वी कृषी अधिकाऱ्याचा दारू अड्डा या आशयाचे वृत्त मीडियात येताच पारनेर पोलिस ठाण्याचे निरिक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलिसांनी कारखिले वस्ती येथील त्या कृषी सहाय्यकाच्या मालकीच्या हाँटेलवर छापा मारून 1250 रूपयांचा गावठी दारूसाठा जप्त केला.

या बाबत पोलिस हे. कॉ. नरसिंह शेलार यांनी शिवकांत भाऊसाहेब कोल्हे, नारायन किसन पवार, शोभा किसन पवार या तिघांविरूद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या कृषी अधिकाऱ्याने तीन वर्षापासून येथे जागा खरेदी करून हॉटेल चालु केले होते.

तिथे जेवणाऐवजी गावठी, देशी -विदेशी दारू विक्री केली जात होती. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु माझ्या जागेत मी काहीही करील अशी अरेरावी तो सतत करीत होता. त्यामुळे ग्रामस्थही हतबल झाले होते.

क्लिक करा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

अखेर शनिवारी संबंधित कृषी सहाय्यकाला ग्रामपंचायत कार्यालयाकडून दारू विक्री बंद करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. कृषी विभागातील अधिकारी सरकारी नोकर असतानाही असे उद्योग करत असल्याबाबत नागरिकांनी आश्वर्य व्यक्त केले आहे. या कृषी अधिकाऱ्याची या प्रकरणी विभागीय चौकशीची मागणी लोकजागृती सामाजिक संस्थेने केली आहे.