
Devotees in Pathardi and Karjat bid farewell to Lord Ganesha with late-night visarjan processions."
Sakal
पाथर्डी: गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी गणरायाला शांततापूर्ण वातावरणात निरोप दिला. शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरवात अजंठा चौकातून दुपारी तीन वाजता सुरवात झाली तर रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले.