

Long queues of two-wheelers at a petrol pump in Sangamner amid fuel shortage and price hike fears.
sakal
संगमनेर: जागतिक पातळीवरील तणावपूर्ण घडामोडींचे पडसाद आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे उमटताना दिसत आहे. संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात इंधनासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी (ता.२३) पहावयास मिळाले. गॅस सिलिंडर भरण्यासाठी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या भीतीने वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवरही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.