१० हजाराची लाच स्वीकारतांना ‘वाघ’ जेरबंद; भाचीचे प्रकरण तडजोडीने मिटवण्यासाठी मागितली लाच

शांताराम काळे
Tuesday, 15 December 2020

अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संतोष वाघ यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

अकोले (अहमदनगर) : भाचीने तिचे कौटुंबिक वादात सासरच्या लोकांविरुद्ध दिलेल्या अदखलपात्र तक्रारीमध्ये दोन्ही कुटुंबात तडजोड करून दिल्याचे मोबदल्यात १० हजारांची लाच घेताना अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संतोष वाघ यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. 

काही महिन्यापासून अकोले पोलिस स्टेशनला ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. काही दिवसांपूर्वी  अकोले पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचारीना टायर चोरीप्रकरणी दोषी आढळत असल्याचे कारणाने निलंबित करण्यात आले आहे. यानंतर निलंबितापैकी एकाने सोशल मिडीयाचे माध्यमातून ॲडिओवार सुरु केला. यामध्ये मोबाईल संभाषणात गोमांस वाहतुकीला मदत केल्याचे संभाषण व्हायरल झाले. यानंतर पोलिस अधिक्षक यांनी एका हवालदाराला निलंबित केले गेले. 

सर्व घडामोडीत तत्कालीन पोलिस निरीक्षकांचीही तडकाफडकी बदली करुन नवीन पोलिस निरीक्षक अकोलेला पाठवण्यात आले. अशी चार पोलिस कर्मचारी निलंबनाची घटना ताजी असतानाच काल अकोले पोलिस स्टेशनचा पोलिस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने अकोले पोलिस स्टेशनच्या अडचणीत दिवसे दिवस वाढ होत आहे. नूतन पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पोलिस ठाण्यामधील भ्रष्टाचार पुढे आला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
याबाबत लाचलुपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या वतिने दिलेल्या प्रेस नोट मध्ये म्हटले की, तक्रारदार यांचे भाचीने तिचे कौटुंबिक वादाचे कारणास्तव तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध अकोले पोलिस स्टेशनला दिलेल्या अदखलपात्र तक्रारीमध्ये दोन्ही कुटुंबात तडजोड करून दिल्याचे मोबदल्यात पोलिस नाईक संतोष वाघ याने आज सोमवार दि १४ डिसेंबर २०२० रोजी १० हजार रूपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम वाघ यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये स्वीकारताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने आज रंगेहात पकडले आहे.यावेळी हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. 

सदर सापळा मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.श्री दिनकर पिंगळे सो, पोलीस उपअधीक्षक, वाचक, लाप्रवि, नाशिक.यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री प्रभाकर कारभारी निकम,  पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.,संदीप साळुंके, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., नाशिक.यांच्या पथकाने मारला असुन यमध्ये पो.हवालदा पंकज पळशीकर, पो.ना. वैभव देशमुख, पो.ना. प्रभाकर गवळी व चालक पोहवा. संतोष गांगुर्डे, सर्व नेमणूक- लाप्रवि, नाशिक आदि होते.सदर गुन्हा अकोले पोलिस स्टेशनला उशीरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरु होते तर लाचखोर  पो.ना.वाघ याला उशिरा वैद्यकीय तपासणी करुन अटक केली जाणार असल्याचे समजते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested Santosh Wagh while accepting bribe of Rs 10000