यिन’च्या संधीचे सोने करा; पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप

पदाधिकाऱ्यांचा शपथविधी उत्साहात; व्यासपीठाचा उपयोग करून घ्यावा
yin
yinsakal

अहमदनगर : ‘‘सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क)उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्या संधीचे सोने करून स्वतःचा विकास करा. आजचा तरुण हा देशाचे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी ‘यिन’च्या व्यासपीठाचा उपयोग करून घेतला पाहिजे,’’ असे आवाहन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.

yin
मूर्तिजापूर : ‘त्या’ आरोपीस दुहेरी जन्पठेपेची शिक्षा

सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (‘यिन’) अंतर्गत निवडणुका संपूर्ण जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नुकत्याच पार पडल्या. त्यातून महाविद्यालय अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचा शपथविधी सोहळा व प्रमाणपत्रांचे वाटप आज पेमराज सारडा महाविद्यालयात झाले. ‘सकाळ’चे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील, सहायक वितरण व्यवस्थापक देविदास आंधळे व सानप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सानप यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली.

yin
परभणी : सख्ख्या भावाच्या खुनाबद्दल आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

प्रकाश पाटील म्हणाले, ‘‘बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत आहेत. कष्टातून शिक्षण घेतात. शिक्षणासाठी आई-वडील हवी ती मदत करतात. विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविले पाहिजे. वाचन केले पाहिजे. कोणत्याही उपक्रमासाठी स्वतः पुढे आल्यास भविष्य उज्ज्वल असेल.’’

वरिष्ठ बातमीदार मुरलीधर कराळे यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. या वेळी आकांक्षा सातपुते आणि विकास सापते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन यश देवधर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com