गटारीच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा ठेवलेल्या घरावर पोलिसांचा छापा ‘एवढ्या’ रक्केची दारु जप्त

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

गटारी आमवसेच्या पार्श्वभूमीवर देशी- विदेशी दारूचा खप मोठ्या प्रमाणात होतो. तालुक्यात अद्यापही अधिकृत परमिटरूम व बार सुरू झाले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते.

पारनेर (अहमदनगर) : गटारी आमवसेच्या पार्श्वभूमीवर देशी- विदेशी दारूचा खप मोठ्या प्रमाणात होतो. तालुक्यात अद्यापही अधिकृत परमिटरूम व बार सुरू झाले नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते.

याचा आंदाज घेऊन जवळा येथे राहुल सालके व सुदाम पठारे (दोघेही रा. जवळा) यांनी सुमारे 75 हजार 30 रूपयांची देशी विदेश दारू नविन बांधकाम सुरू असलेल्या घरात आणून ठेवली होती. ही माहीती समजाताच पारनेर पोलिसांनी तेथे छापा टाकून देशी विदेशी दारूच्या मुद्देमालासह या दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्वच परमिट रूम बंद आहेत. आषाढ महिन्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो. तसेच विविध देवदेवतांच्या जत्रा ही केल्या जातात. या जत्रेसाठी बोकड किंवा कोंबडे बळी देण्याची प्रथा आहे. त्यातही आषाढ महिन्यानंतर येणाऱ्या श्रावणात बहुतेकजण दारू व मांसहार करत नाहीत. त्यामुळे आषाढच्या शेवटच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मांसहार केला जातो. या काळात दारूचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. याचा आंदाज घेऊन जवळे येथील सालके व पठारे या जोडीने सुमारे 75 हजार 30 रूपयांची देशी विदेशी दारू नविन बांधकाम सुरू असलेल्या घरात आणून ठेवली होती.

हेही वाचा : पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना पाथर्डीत भाजपच्या कार्यकारणीत डावलले
एवढी मोठ आगाऊ तयारी केली होती. मात्र तिलाही द्रुष्ट लागली पोलीसांना त्यांनी आणलेल्या दारूच्या साठ्याची कुणकुण लागली व तात्काळ पोलीस उपअधिक्षक अजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी आपल्या कर्मचा-यांसह जवळा येथे छापा टाकला. पोलीसांनी त्याठिकाणी असलेली देशी विदेशी दारू सह संबधीत दोन्ही आरोपींनाही त्याच वेळी ताब्यात घेतले. या बाबत रात्री उशीराने पारनेर पोलीस ठाण्यात सालके व पठारे या दोघांच्या विरोधात अवैध दारू विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police raid liquor store in Parner taluka