अहमदनगर : गावठी दारूभट्ट्यांवर छापे; 1 लाखांचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police raid on liquor kilns

अहमदनगर : गावठी दारूभट्ट्यांवर छापे; 1 लाखांचा साठा जप्त

अहमदनगर : स्थानिक गुन्हे शाखेने गावठी दारूभट्ट्यांविरुद्ध मोहिम सुरू केली आहे. नेप्ती (ता. नगर) येथे तीन गावठी दारूभट्ट्यांवर छापे टाकून एक लाख चार हजार 500 रुपयांचा गावठी दारूचा साठा आणि कच्चा माल हस्तगत केला. या प्रकरणी आरोपी कानिफनाथ भिमोजी कळमकर (35), राजू छबू पवार (30), राजेश बाजीराव पवार (वय 42) यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अबब! दारुसाठी 800 लिटर कच्चे रसायन

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, हवालदार विजयकुमार वेठेकर, बबन मखरे, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, सचिन आडबल, आकाश काळे, मयूर गायकवाड, संभाजी कोतकर यांच्या पथकाने नेप्ती (ता. नगर) येथे छापे टाकले. कानिफनाथ भिमोजी कळमकर (रा. कळमकरवस्ती, नेप्ती) याच्या भट्टीवर छापा टाकून 700 लिटर दारू आणि कच्चे रसायन असा 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: अहमदनगर : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक

राजू छबू पवार याच्या दारूभट्टीवर छापा टाकून 30 लिटर तयार दारू आणि 800 लिटर कच्चे रसायन असा 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजेश बाजीराव पवार याच्या दारूभट्टीवर छापा टाकून 30 लिटर दारू व 400 लिटर दारू तयार करण्याचे रसायन असा 23 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तिन्ही आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याप्रमाणे नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: संगमनेर : विवाहित प्रेयसीची आत्महत्या; प्रियकराचा स्मशानात निर्घृण खून

Web Title: Police Raid On Liquor Kilns Ahmednagar Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..