
अहमदनगर : भिंगार पोलिसांकडून 65 बेवारस वाहन मालकांचा शोध
अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्थेच्या अभिनव उपक्रमांर्तगत 65 बेवारस वाहन मालकांचा शोध लावण्यात यश आले आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.
शेकडो वाहने वर्षांनुवर्षे धुळखात पडून
भिंगार कॅम्प पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेले तर काही अपघातातील वाहने पोलिस ठाण्याच्या परिसरात आणून लावली होती. शेकडो वाहने न्यायालयीन प्रक्रिया, तसेच मालक मिळून येत नसल्याने ही वाहने पोलिस ठाणे आवारातच वर्षांनुवर्षे मालकाच्या प्रतिक्षेत धुळखात पडून होती. ही बाब लक्षात घेऊन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. वाहनांचे चेसीस व इंजीन नंबरवरून आठ दिवसांत 65 वाहनांच्या मूळ मालकांचा शोध मावळ तालुक्यातील परंदवाडी (जि. पुणे) येथील गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने पोलिसांनी शोध घेतला.
हेही वाचा: अहमदनगर : गावठी दारूभट्ट्यांवर छापे; 1 लाखांचा साठा जप्त
वाहन मालकाने वाहनांचे नोंदणी क्रमांक, वाहनाचा प्रकार, चेसीस, इंजीन नंबर, वाहन मालकाचे नाव, पत्ता यांची यादी पोलिस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेली आहे. शोध लागलेल्या वाहनांच्या मालकांनी आपली, वाहनांची ओळख पटवून व पुरावे देऊन वाहन परत घेऊन जाण्याचे आवाहन भिंगार कॅम्प पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, उपनिरीक्षक सतीश शिरसाठ, मुद्देमाल कारकून सहाय्यक उपनिरीक्षक आर. एस. वैरागर, पोलिस नाईक राहुल द्वारके, संतोष आडसूळ, संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब वागडे, भारत वाघ, गोरख नवसुपे, संजय काळे यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
हेही वाचा: अहमदनगर : दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक
Web Title: Police Searched For 65 Vehicle Owners Ahmednagar Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..