Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Mahayuti campaign: शिंदे यांनी विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर टीका करत जनतेने भ्रमित न होण्याचे आवाहन केले. महायुती सरकारने महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या असून पुढील काळातही त्या अधिक बळकट करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
DyCM Eknath Shinde Defends Ladki Bahin Scheme; Addresses Mahayuti Rally

DyCM Eknath Shinde Defends Ladki Bahin Scheme; Addresses Mahayuti Rally

Sakal

Updated on

संगमनेर: ‘‘राज्याच्या विकासाला गती देणे हे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे पहिले पाऊल होते. त्यानंतर सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कोणताही माईचा लाल ही योजना बंद करू शकत नाही; कारण आपल्याला लाखो लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आहेत,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com