esakal | आमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Political story of MLA Rohit Pawar and MP Sujay Vikhe Patil

कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एका वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते.

आमदार रोहित पवार, खासदार डॉ. विखे पाटील अन्‌ पंकजा मुंडे यांनी जीवनातील किस्से, एकमेकांवर कोटी करीत उडवून दिली धमाल

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील व भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे हे एका वाहिनीवरील ‘ज्याची राज्यात मोठी हवा आहे’ त्या विनोदी कार्यक्रमात हे सहभागी झाले होते. 

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी मुंडे यांच्या साक्षीने एकत्र येत राजकारण विरहित मैत्रीचा धागा कायम असल्याचे आवर्जून सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच आमचे पणजोबा विखे कारखान्यात कृषी अधिकारी होते तेंव्हापासून असलेल्या संबंधाचा आमदार रोहित पवार यांनी यावेळी उल्लेख केला. याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : पारनेर मतदारसंघातील ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी दोन्ही गटाशी चर्चा करणार
आमदार पवार यांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी आवडते चित्रपट, डायलॉग कुठला त्याबद्दल सांगितले. तसेच लग्नाच्यावेळी घेतलेला उखाणा देखील त्यांनी यावेळी घेतला.

हे आवडते पदार्थ...
पत्नीच्या हातचं मेथी, पिठलं आणि बिर्याणी हे पदार्थ आवडतात. पण त्याचवेळी भूक लागल्यावर काहीही चालते हे सुद्धा त्यांनी सांगितले.  करोनाकाळात आई सुनंदा पवार यांच्याकडून चहा बनवायला शिकल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउनमध्ये पत्नीला मी केक बनवायला मदत करत होतो. पण माझ्या मदतीमुळे तिला दोनवेळा केक बनवावा लागल्याचा गंमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला.  

हे आहेत आवडते चित्रपट आणि त्या तील डायलॉग...
हिंदीतील 'चक दे', 'दंगल' हे आवडते चित्रपट आहेत. मराठीतील 'सिंहासन' आणि 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट आवडतो.  'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट तर सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन असल्याचे त्यांनी सांगितले.  

राजकीय क्षेत्रात काही वेळा डायलॉग मारावा लागतो. 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'कोई चीज मनसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने मे जुट जाती हैं", 'पिक्चर अभी बाकी है' हे आवडते डायलॉग असल्याचे त्यांनी सांगितले.  

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकारण विरहित मैत्रीला प्राधान्य...

राजकीय जीवनात राजकीय विरोध दर्शवला जातो. पण व्यक्तीगत जीवनात मात्र मैत्री ठेवली पाहिजे. आजच्या काळात याच गोष्टीची उणीव जाणवते. राजकारणात वैर ठेवू नये. व्यक्तीगत जीवनात मैत्री जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सहभागी झाले होते.लोकसभेची निवडणूक ही जीवनातील पहिलीच निवडणूक होती,यासाठी सर्वस्व पणाला लावले होते मात्र त्या वेळी वडील राज्याचे विरोधीपक्ष नेते होते तर आई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या मात्र जनाधार मिळाला.ही निवडणूक बरच काही शिकवून आणि अंतर्मुख करून गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजपा नेत्या पंकजा मुंडे सुद्धा सहभागी झाल्या होत्या. व्यक्तीगत जीवनातील गमती-जमती, आवडी-निवडी आणि काही किस्से त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात डॉ. विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री यांना एका खेळात घड्याळ बक्षीस मिळाले यावर कोटी करीत रोहित पवार म्हणाले, काय योग्य आहे हे घरच्यांना कळते- यावर आहे तिथे सुखी आहे, असे डॉ. सुजय यांनी म्हणताच एकच हशा पिकला. 

संपादन : अशोक मुरुमकर