
Prajakt Tanpure : गतिमान नव्हे, गतिमंद राज्य सरकार; प्राजक्त तनपुरे
राहुरी : मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नाही. तोच, पुन्हा अवकाळीच्या तडाख्यात शेतकरी सापडला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन गतिमान नव्हे तर गतिमंद झाले आहे, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
वळण येथे अवकाळी पावसाने नुकसानीची बांधावर जाऊन तनपुरे यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. नायब तहसीलदार संध्या दळवी, तालुका कृषीअधिकारी महेंद्र ठोकळे, कृषी सहाय्यक गडधे, सरपंच सुरेश मकासरे,
अशोक कुलट, ज्ञानेश्वर खुळे, रविंद्र आढाव, दत्तात्रेय खुळे, बाळासाहेब खुळे, बी. आर. खुळे, प्रकाश आढाव, बाबासाहेब आढाव, बाळासाहेब शिंदे, एकनाथ खुळे, रोहिदास आढाव, विक्रम कार्ले, संजय आढाव, बाबासाहेब कार्ले, उमेश खिलारी, रविंद्र गोसावी, दादासाहेब कुलट, संतोष काळे उपस्थित होते.
तनपुरे म्हणाले, की वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका; पाठोपाठ अवकाळीचा तडाखा अशा संकटांनी घेरले आहे.
पिक विम्याची नुकसान भरपाई असून नसल्यासारखी आहे. शासनातर्फे अतिवृष्टीची तुटपुंजी मदत जाहीर झाली. तीही अद्याप मिळाली नाही. आता, अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी.