Prasadalaya in Shirdi closed
Prasadalaya in Shirdi closed

शिर्डीतील प्रसादालय बंद झाल्याने भाविकांची पंचाईत

शिर्डी ः साईबाबांचे भक्त संपूर्ण जगभर आहेत. साईदरबारात गेलेला कोणीही व्यक्ती उपासी राहत नाही. किंबहुना बाबा त्याला रिकाम्या हाताने जाऊच देत नाहीत, असाच आजवर भाविकांचा अनुभव आहे. आपल्याला बाबांमुळेच संपत्ती मिळाली, असे बहुतांशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे ते बाबांच्या चरणी त्यातील काही भाग अर्पण करतात. काही रितसर पावती करतात तर काही दानपेटीत रक्कम टाकतात. त्या पैशातून प्रसादालय चालविले जाते.

या प्रसादालयात गरीबांसोबत श्रीमंतही प्रसाद घेतात. लॉकडाऊन झाले तसे साईसंस्थान तर्फे दिले जाणारे भोजन बंद झाले. त्यामुळे अनेकांची उपासमार होऊ लागली. त्यामुळे ते घराकडे परतले. परंतु बाबांच्या दरबारात दररोज हजारो जेवतात. त्यांची पंचाईत झाली आहे. आता काहीच पर्याय नसल्याने त्यांनी नवे तवे खरेदी केले आहेत.

शहराभोवतालच्या गावात वीटभट्या आहेत. तेथील किमान दीड ते दोन हजार मजुर आपल्या लेकराबाळांसह ट्रॅक्‍टरमधुन येथे येत. संस्थानच्या प्रसादालयात दिवसातून दोन वेळा भोजन घेत.

रस्त्यावरील फेरीवाल्यापासून ते फुलांचे गुच्छ विकणाऱ्यापर्यंत सात ते आठ हजार लोक प्रसादालयात येऊन उदरभरण करीत. वाचलेल्या खर्चातून काहीजण व्यसने तर काहीजण बचत करून घराकडे पाठवीत. 

असे असते भोजन

चपाती, दोन भाज्या, डाळभात व गोड पदार्थ असे स्वादिष्ट आणि गरमागरम जेवण मिळते. 

संस्थानकडे आजही गरिबांना मोफत जेवण देण्याची सुविधा आहे. तेथे गरजू मंडळी भोजन घेऊ शकतात. मात्र, प्रसादालयातील जेवण मोफत केल्याने स्वच्छता न पाळणाऱ्या मंडळींना तेथे येण्यास मोकळे रान मिळते. भाविकांना त्याचा त्रास होतो. लॉकडाऊनमुळे मात्र, या मंडळीवर तवे खरेदी करण्याची वेळ आली. 

पहिल्यांदाच तवे घेतले

आमदार राधाकृष्ण विखे पाटील व प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर यांनी ही तवे खरेदीची कहाणी सांगताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, त्यांनी आयुष्यात प्रथमच तवे खरेदी केले. त्यांना काही दिवस तरी घरी स्वयंपाक करू द्या.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com