वृक्षारोपणाने प्रशांत गडाखांचा वाढदिवस साजरा ; मोरयाचिचोंरे येथे मित्रमंडळाचा उपक्रम

विनायक दरंदले
Wednesday, 30 December 2020

गडाख यांनी मोरयाचिचोंरे गाव दत्तक घेतलेले आहे. या गावात प्रतिष्ठाणच्या वतीने आरोग्य, जलसंधारण, पर्यावरणसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहे.

सोनई (अहमदनगर) : यशवंत सामाजिक प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे तालुका मित्रमंडळाने आदर्शगाव नेवासे तालुक्यातील मोरयाचिचोंरे येथे १०१ झाडांचे वृक्षारोपण करुन सामाजिक उपक्रम राबविला.

हे ही वाचा : हरिश्चंद्रगडावरील पुरातन मंदिराची दुरावस्था ; नंदीचे तोंड झाले नाहीसे ! मूर्ती गायब

गडाख यांनी मोरयाचिचोंरे गाव दत्तक घेतलेले आहे. या गावात प्रतिष्ठाणच्या वतीने आरोग्य, जलसंधारण, पर्यावरणसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहे. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त येथे ५० हजाराहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे. येथे मागील वर्षापासून 'माझा वाढदिवस माझे झाड' उपक्रम सुरु आहे.

हे ही वाचा : विना इंधन वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत सायकल रॅली

प्रशांत गडाख मित्रमंडळाच्या वतीने राजेंद्र चौधरी, दिपक धनगे, ईश्वर उगले यांनी फळ-फुलांचे १०१ रोपे आणून मोरयाचिचोंरे जंगलात वृक्षारोपण केले. यावेळी दिगंबर वरखडे, दिलीप शेलार, भगवान काळे उपस्थित होते. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President of Yashwant Social Foundation Prashant Patil Gadakh has planted trees in Newase taluka on the occasion of his birthday