esakal | तहसील कार्यालयातील वीज गेली; ‘व्हीसी’ला जॉईन होण्यासाठी तहसीलदारांनी गाटले थेट नगर 
sakal

बोलून बातमी शोधा

Problem due to power outage in tehsil office in Shevgaon

शेवगाव शहरासह तालुक्यातील वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले.

तहसील कार्यालयातील वीज गेली; ‘व्हीसी’ला जॉईन होण्यासाठी तहसीलदारांनी गाटले थेट नगर 

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : शहरासह तालुक्यातील वीजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त झाले असून महावितरणच्या गलथानपणाचा फटका तालुक्यातील प्रशासकीय प्रमुख असलेल्या तहसिलदार अर्चना भाकड यांना बसला. कार्यालयातील वीज अचानक खंडीत झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडीओ काँन्फरन्सला त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांना थेट नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून संबंधीत विषयावरील मिटींगचे मुद्दे घ्यावे लागले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शहर व तालुक्यातील वीज पुरवठा गेल्या काही दिवसापासून वारंवार खंडीत होत आहे. तसेच अनेक वेळा तर दिवसभर वीज गायब असते. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक उदयोग धंदे व व्यावयासिकांवर होत असून त्यांना दिवसभर बसून राहण्याची वेळ येते. त्याचा मोठा आर्थिक फटका संबंधीतांना बसत असतांना महावितरणने मात्र वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी फारसे गांभीर्य दाखवले नाही. शहरातील सर्व शासकीय कार्यालयात संगणकीय पध्दतीने कामकाज होत असल्याने दिवसभर कार्यालयीन कामाच्या वेळेतच वीज गायब असल्याने गेल्या काही महिन्यापासून सर्व कार्यालयातील अनेक महत्वाचे कामे प्रलंबीत आहेत. वीज गायब असल्याने संबंधीत विभागाकडे काम घेवून येणा-या नागरीकांनाही ताटकळत बसावे लागते. वीज नेमकी कधी येईल वीजेव कधी जाईल याबाबत अनिश्चितता असल्याने सर्वच कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.

वीजेचा वापर जास्त असूनही शहरातही वीजपुरवठा सतत खंडीत होण्याचे प्रकारांमुळे व वीजेचा दाब कमी जास्त झाल्याने विदयुत उपकरणे जळण्याचे ही प्रमाण वाढले आहे. त्याच भुर्दंड ग्राहकांना नाहक सोसावा लागतो. गेल्या दोन तीन महिन्यापासून शेवगाव शहर उपकेंद्रातील ब्रेकर व रिले खराब झाल्यामुळे दाब येवून विदयुत पुरवठा खंडीत होतो. तर कधी दुरुस्तीच्या नावाने तर कधी 220 केव्ही केंद्रातून पुरवठा खंडीत असल्याचे सांगण्यात येते. आठवडयातून किमान चार पाच दिवस तरी आपत्कालीन दुरुस्तीच्या नावाखाली वीज गायब असते. त्यामुळे अव्वाच्या सव्वा येणारे वीज बीले भरुनही ग्राहकांना हा खंडीत वीज पुरवठयाचा मनस्ताप सोसावा लागतो. ग्राहकांनी वारंवार तक्रार करुनही याबाबत सुधारणा होत नसल्याने शहरातील ग्राहकांचा संयम आता सुटत चालला आहे. 

शुक्रवारी महावितरणच्या खंडीत वीज पुरवठयाचा फटका तालुक्याच्या तहसिलदार अर्चना भाकड यांनाही बसला. दुपारी 12 च्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी महसुल विभागाच्या नियमीत विषयावरील आयोजीत व्हिडीओ काँन्फरन्स मिटींग त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांना जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार थेट नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून संबंधीत विषयावरील मिटींगचे मुद्दे घ्यावे लागले. त्यामुळे त्यांचा प्रशाकीय कामकाजाचा वेळ वाया गेला. 

हेही वाचा : १६ न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी महसुलमंत्र्यांनी केले प्रयत्न
शहरातील खंडोबानगर उपकेंद्रातून शहराला होणारा वीज पुरवठा तेथील नादुरुस्त ब्रेकर व रीलेमुळे वारंवार खंडीत होत आहे. संबंधीत साहित्य पुरवण्याचा ठेका नासिक येथील एका कंपनीस देण्यात आलेला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून साहित्य मिळत नसल्याने याबाबतची दुरुस्ती करता येत नाही, असे महावितरणचे सहाय्यक अभियंता सुशील तायडे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top