esakal | डॉ. प्रीतम मुंडेंना डावलल्याने भाजप नेत्यांचा निषेध; नगरमध्ये कार्यकर्त्यांकडून घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-MP-Pritam-Munde

डॉ. प्रीतम मुंडेंना डावलल्याने भाजप नेत्यांचा जाहीर निषेध

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

अहमदनगर : प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी भाजपचे रोपटे राज्यात लावले. त्यानंतरच्या काळात भाजपचा वटवृक्ष झाला. पक्षाला युतीच्या माध्यमातून राज्यात सत्ता प्राप्त झाली. आता केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली. आजही केंद्रात भाजप सत्तेत आहे. ही सगळी किमया मुंडे-महाजन यांनी घडविली आहे. मात्र, आज त्यांच्या मागे अलीकडच्या नेतृत्वाने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलून समाजाचा विश्वासघात केला, असा आरोप जय भगवानबाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला. (protest-against-BJP-leaders-not-giving-ministerial-post-to-Pritam Munde-ahmednagar-political-news)

कार्यकर्त्यांनी दिल्या भाजपच्या विरोधात घोषणा

जय भगवानबाबा महासंघातर्फे आयोजित निषेध सभेत ते बोलत होते. यावेळी डॉ. मुंडे यांना मंत्रिपदाची संधी न दिल्याबद्दल भाजपमधील असंतुष्ट नेत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मदन पालवे, कैलास गर्जे, किशोर पालवे, हेमंत राख, शिवाजी पालवे, संपर्कप्रमुख डॉ. श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड, शरद मुर्तडकर, ॲड. पोपट पालवे, संदीप जावळे, ऋषिकेश पालवे, देविदास गिते, रमेश पालवे, शिवाजी गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीकांत चेमटे, संजय आव्हाड, कैलास गर्जे आदींची समयोचित भाषणे झाली. सभेनंतर सर्व कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणा दिल्या.

(protest-against-BJP-leaders-not-giving-ministerial-post-to-Pritam Munde-ahmednagar-political-news)

हेही वाचा: PM योजनेतील एक कोटीचा हप्ता थकीत

हेही वाचा: ॲड. प्रताप ढाकणे ॲक्शन मोडमध्ये; मतदारसंघात दौरे केले सुरू

loading image