

Digital Scam Alert! QR Code Trick Used to Cheat Setu Drivers in Belapur Area
Sakal
श्रीरामपूर: शहर आणि तालुका परिसरात ‘नातेवाईक आजारी’ असल्याचे खोटे कारण पुढे करून क्यूआर कोडद्वारे पैसे आपल्या खात्यावर जमा करून तत्काळ रोख रक्कम उचलण्याचा डाव आखणाऱ्या एका भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. राहिल युनूस शेख (रा. फ्लॅट नं. १३, सनी अपार्टमेंट, वडाळा शिवार, नाशिक) असे या भामट्याचे नाव आहे. त्याने दोन ग्राहक सेवा केंद्र चालकांची तब्बल एक लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.