
शिर्डी : अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या तीनशे कुटुंबांना नगरपरिषदेच्या वतीने हक्काची घरे भेट दिली जाणार आहेत. आज जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांनी विस्थापितांच्या मेळाव्यात ही घोषणा केली. पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाच्या नावे अर्धा गुंठा जमिनीचा सात-बारा उतारा दिला जाईल.