esakal | असमंजस सरकारला श्रीगणेश सुबुद्धी देवोत; विखे पाटलांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

vikhe and thackeray

असमंजस सरकारला श्रीगणेश सुबुद्धी देवोत : विखे पाटील

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : कोविड (covid) नियमांचे पालन करून राज्यभरातील मंदिरे भाविकांसाठी खुली करा, या भाजपच्या (bjp) मागणीकडे महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) मुद्दाम दुर्लक्ष करते. मात्र, या मंदिरांवर हजारो कुटुंबीयांची रोजीरोटी आणि त्या-त्या भागातील अर्थकारण अवलंबून आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. असे असमंजस सरकार हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. श्रीगणेश त्यांना सुबुद्धी देवोत, अशी प्रार्थना आज आपण केली, अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी व्यक्त केली.

राज्य सरकारच्या डोक्यातील भ्रम दूर व्हायला तयार नाही

प्रवरा उद्योगसमूहाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना त्यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गणेश कारखाना कार्यस्थळावरही त्यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विखे पाटील म्हणाले, की कोविडचे संकट कायम स्वरूपी जावे आणि सर्वांच्याच जीवनात पुन्हा स्थिरता यावी, अशी मनोकामना देशातील प्रत्येकजण व्यक्त करत आहे. सर्व धर्मांचे उत्सव कोविड नियमांचे पालन करून साजरे करू द्यायला हवेत. देशभरातील मंदिरे सुरू आहेत मात्र, मंदिर बंद ठेवून कोविड संकट टळेल हा राज्य सरकारच्या डोक्यातील भ्रम दूर व्हायला तयार नाही.

हेही वाचा: शांतताप्रिय तंटामुक्त गावातच राडा! 20 जणांवर गुन्हा

हेही वाचा: पारनेर : आमदार लंकेंच्या समर्थकावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

loading image
go to top