Rahuri : देवळाली नगरपालिका राज्यात तिसरी

शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केंद्रीय समितीने केली होती
RAHURI
RAHURISAKAL

राहुरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेला ‘क’ वर्ग नगरपरिषदेत कचरामुक्त शहरासाठी थ्री-स्टार मानांकन व ओडीएफ प्लस प्लस मानांकन जाहीर झाले आहे. नगरपरिषदेला देशाच्या पश्चिम विभागात व राज्यात तिसरा क्रमांक मिळाला, अशी माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.

निकत म्हणाले, की स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र शासनातर्फे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार खात्याकडून दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात, देवळाली प्रवरा परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. घरोघरी जाऊन ओला-सुका कचरा वर्गीकरण, त्याचे शंभर टक्के संकलन, प्लॅस्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी, शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केंद्रीय समितीने केली होती. सर्वांच्या सहकार्याने हे यश मिळाल्याचे निकत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com