विखेंना दणका; राहुरीच्या कारखान्यावर ठाकरे सरकारची मोठी कारवाई

खासदार सुजय विखे
खासदार सुजय विखे
Updated on

राहुरी येथील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. कारखान्याकडून तब्बल एक कोटी 17 लाख रुपयांचे वीजबिल थकीत होतं. वारंवार नोटीस देऊनही वीजबिल न भरल्यामुळे या कारखान्याचा वीज पुरवठा महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महावितरण कंपनीने खंडित केला आहे. यामुळे कारखाना परिसर आणि कामगार वसाहतीत अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी कारखान्यावर सत्ता आहे. हा कारखाना सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वीच विखेंनी यामध्ये लक्ष घालून काही काळ कारखाना चालविला. पण, अडथळे काही थांबले नाहीत. कामगारांची देण्याबरोबर वीजबिलही थकले. एक कोटी 17 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागांतर्गत येणाऱ्या महावितरण कंपनीने यासाठी वारंवार नोटिसा पाठवल्या. मात्र, थकबाकी भरली गेली नाही. परिणामी कारखान्याचीही वीज तोडण्यात आली आहे.

खासदार सुजय विखे
...तर निर्बंध कमी होतील, राजेश टोपे यांचं सूचक विधान
खासदार सुजय विखे
'मंत्री झाले अन् कोकणावर संकट आलं, राणे पांढऱ्या पायाचे'

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात हा कारखाना आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांचे नाव कारखान्याला देण्यात आलेले आहे. तसेच त्यांचे वडील माजी खासदार डॉ. प्रसाद तनपुरे यांचेही या कारखान्यात मोठे योगदान होते. तनपुरे कुटुंबाची सत्ता या कारखान्यावर दीर्घकाळ होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Tighten Noose Around Gender Testing Racket; More Arrests Likely After Fresh Seizure
Allegations Over Evaluation Process Prompt Fresh Review of Panchayats Across State
Pune Doctor Among Latest Arrests in Widening Illegal Foetal Sex Determination Network
Shepherd Loses Life in Massive Explosion After Handling Unexploded Bomb
Marathi News Esakal
www.esakal.com