श्रीरापूरातुन कोणत्या वेळेत कोठे एसटी बस? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी

गौरव साळुंके
Wednesday, 26 August 2020

श्रीरामपूर एसटी आगारातुन विविध ठिकाणासाठी 33 एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपासून एसटीचे चाक रुतले होते. लॉकडाउन शिथीलतेनंतर नियम आणि अटी घालुन एसटी सुरु झाली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील एसटी आगारातुन विविध ठिकाणासाठी 33 एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपासून एसटीचे चाक रुतले होते. लॉकडाउन शिथीलतेनंतर नियम आणि अटी घालुन एसटी सुरु झाली.

कोरोनाच्या धास्तीमुळे त्यास प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आता सरकाने नियम आणि अटी घालुन एसटी पुर्णपणे सुरळीत सुरु करण्याच्या सुचना दिल्यानंतर एसटी रस्त्यावर धावताना दिसत आहे. त्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आगरातुन एसटी बस प्रवासासाठी जाण्यापूर्वी सॅनिटाईज करण्यात येते. प्रवाश्यांना विविध सुचना दिल्या जातात. येथील एसटी आगारातुन पुणे येथे जाण्यासाठी सकाळी सहा, साडेआठ वाजता आणि दहा वाजता एसटी सुरु करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे, नाशिक, धुळे, कल्याणला जाण्यासाठी नगरमधून यावेळेत आहेत बस

नगरला जाण्यासाठी सात वाजता, सव्वाआठ वाजता, साडेदहा वाजता, बारा वाजता, दिड वाजता, सव्वातीन वाजता, पाच वाजता आणि सहा वाजता एसटी जाणार आहे. कोपरगावला जाण्यासाठी आठ वाजता, दहा वाजता, साडेआकरा वाजता, बारा आणि साडेपाच वाजता एसटी सोडण्यात येत आहे. तर औरंगाबादला जाण्यासाठी नऊ, बारा, साडेबारा वाजता एसटी जाणार आहे. नाशिकला जाण्यासाठी दहा, साडेआकरा आणि सव्वाबारा वाजता एसटी सुटणार आहे.

तसेच जालना येथे जाण्यासाठी सव्वातीन वाजता एसटी आहे. वैजापूर येथे जाण्यासाठी दहा वाजता, सव्वाबारा वाजता, दोन व चार वाजता तर गंगापूर येथे जाण्यासाठी दहा वाजता, साडेबारा वाजता आणि चार वाजता एसटी असल्याची माहिती आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी सांगितली. प्रवाशांनी सोशल डिस्टस्निच्या नियमांचे पालन करुन एसटी प्रवास करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन एसटी आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the news to know where and when ST bus from Shrirapur