Ahilyanagar: जवखेडे खालसातील धार्मिक वाद! 'पाच तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा नाही'; बैठक ठरली निष्फळ

Religious Dispute in Javkhede Khalsa: दोन्हीही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी प्रशासनाने अगोदर चर्चा केली, तर त्यानंतर दोन्हीही गटांच्या म्होरक्यांना एकत्रितरित्या बसवण्यात आले. देवस्थानमध्ये दर गुरुवारी व अमावास्येला आम्हाला धार्मिक विधी करून द्या, असा आग्रह एका गटाने धरला, तर दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला.
Javkhede Khalsa Tensions Persist as Peace Meeting Yields No Result
Javkhede Khalsa Tensions Persist as Peace Meeting Yields No ResultSakal
Updated on

पाथर्डी : तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा देवस्थान ऊर्फ तांबूळदेव देवस्थान येथे धार्मिक विधी करण्याच्या मुद्यावरून दोन गटांत झालेला वाद झाला. या विषयावर आज प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत पाच तास चर्चा झाली. परंतु त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने या सोमवारी (ता. २३) अतिरिक्त पोलिस अधीक्षकांच्या दालनात दोन्हीही गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com