esakal | विंचरणा नदीचा जीर्णोद्धार...रोहित पवारांनी घेतलाय वसा
sakal

बोलून बातमी शोधा

Renovation of Vincharana river

जामखेड तालुक्यात मागील वर्षी आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने 'सकाळ' रिलीफ फंड व बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते.

विंचरणा नदीचा जीर्णोद्धार...रोहित पवारांनी घेतलाय वसा

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : जामखेड शहराला वरदान ठरलेली; अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने, घाणीच्या विळख्यात सापडलेल्या 'विंचरणा' नदीचे रुप पालटवण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला अाहे. 'सकाळ रिलीफ फंड' आणि इतर विविध संस्थांच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते झाला.

विंचरणा नदीचे अरुंद झाले पात्र 

परिसरात उगवलेली खुरटी झुडपे, साचलेल्या गाळामुळे विंचरणेचा श्वासच गुदमरला होता. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. हे आमदार रोहित पवारांनी हेरले आणि पुढाकार घेऊन विंचरणा नदी गाळमुक्त व शुशोभित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जामखेडकरांना सुखावणारा तर विंचरणा नदीचे रुप पालटणारा ठरणार !

हेही वाचा - गंगी-भागीची यारी...झकत गेली दुनियादारी

बीड जिल्हातील चिखली (नाथ) येथे उगमस्थान असलेली विंचरणा नदी अनेक गावांचा आधारवड ठरत डोंगर दर्याच्या कुशीतून मार्ग शोधत मोठ्या अावेषाने श्री क्षेत्र रामेश्वर (सौताडा) येथे उंच कड्यावरुन स्वत:ला दरीतून झोकून देते. ती जामखेडला भुतवडा तलावात येऊन विसावते. तिच्यामुळेच तब्बल पन्नास वर्षापासून जामखेडकरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागली. मात्र जामखेड शहरातून पुढे जाताना (वहाताना) विंचरणा स्वतःचे अस्तित्व हरवून बसली होती.

पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. नदीपात्राचा दुतर्फा खुरटी झुडप वाढली होती. घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. हे आमदार रोहित पवारांचा लक्षात आले. त्यांनी विंचरणेचे 'रुप' पालटण्यासाठी पुढाकार घेतला.

'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून विंचरणा नदी 'गाळमुक्त व सुशोभीकरणाचा' शुभारंभ करण्यात आला.

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गाळ व कचरा काढणे, दुसऱ्या टप्प्यात रस्ता व झाडांची लागवड,
व तिसऱ्या टप्प्यात सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप,सार्वजनिक .बांधकाम उपविभागाचे उपअभियंता कांबळे ,शाखा अभियंता शशिकांत सुतारअधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे,युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, रमेश आजबे,दादा ढवळे,उमर कुरेशी,प्रशांत राळेभात,राजेंद्र गोरे,सुनील कोठारी,रवि शेळके,तात्याराम पोकळे,प्रकाश काळे,हरिभाऊ आजबे,ऋषी कुंजीर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'सकाळ रिलीफ फंडा' ची मिळतेय मदत!
जामखेड तालुक्यात मागील वर्षी आमदार रोहित पवारांच्या पुढाकाराने 'सकाळ' रिलीफ फंड व बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. यावर्षी पुन्हा 'सकाळ' रिलीफ फंड, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन,बारामती अँग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जामखेड शहरातील विंचरणा नदीच्या गाळ काढण्याचा कामाचा शुभारंभ झाला आहे.

"पाणी हे जीवन अाहे. जामखेड हा दुष्काळी भाग असून विंचरणा नदीमुळे जामखेडच्या वैभवात भर पडेल, शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी पुर्वी जीवनवाहिनी होती. परंतु दुर्लक्षित झाल्याने आज नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. मात्र आता आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतलाय. त्यामुळे हे रुप बदलेल," 

- सुनंदा पवार,
विश्वस्त, बारामती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट.

loading image